दि.१७। प्रतिनिधी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे रत्नागिरी दौèयावर आहेत. त्यांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच शशिकांत वारीसे यांचं एका अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा qशदे ङ्कडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शशिकांत वारीसे यांचं हे बलिदान आहे, त्यांच्या मुत्यूमुळे त्यांचा मुलगा आणि आई उघड्यावर पडल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी काम सुरू ठेवलं त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते मारले गेले. खूप गदारोळ झाल्यावर आम्ही मागणी केल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा करण्यात आली. आम्ही पन्नास लाख रुपयांची मागणी केली आहे. जर तुम्ही आमदारांना पन्नास कोटी देता तर या तरुण पत्रकाराच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे, वारीसे यांना पन्नास लाख रुपये तरी द्या असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्यांच्या मुलाला कायमस्वरूपी नोकरी मिळावी अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.