नवी दिल्ली , दि.१७। प्रतिनिधी अमेरिकेतले अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर आता भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही टीका केली आहे. देशातला सर्वात जुना पक्ष अशी ओळख असणाèया काँग्रेसनेही आता असं म्हटलं आहे की भारतात ज्या निवडणुका होतील त्याचे निकाल काय लागावेत हे सांगणं जॉर्ज सोरोस यांच्यासारख्या विदेशी व्यक्तीने ठरवू नये असं जयराम रमेश यांनी सुनावलं आहे. जयराम रमेश यांनी जॉर्ज सोरोस यांना खडे बोल सुनावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदाणी घोटाळ्यावरून आरोप होतो आहेत. त्यानंतर आता भारतात लोकशाहीच्या दृष्टीने काही बदल घडणार का? हे विरोधी पक्ष म्हणजेच आम्ही आणि इतर प्रमुख पक्षांवर अवलंबून आहे. तसंच आमची निवडणूकही लवकरच होणार आहे. पण जॉर्ज सोरोस सारख्या लोकांना याच्याशी काहीही घेणंदेणं असण्याचं कारण नाही. आमच्या देशाचा विचार हा नेहरूवादी विचार आहे. आम्हाला आमचा विचार आणि आमची शिकवण हेच सांगते की जॉर्ज सोरोस सारख्या लोकांनी आमच्या देशांतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये या आशयाचं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे. आजच्या घडीला भारताचे आभार मानणाèयांमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत.
ङ्क्रान्सचे राष्ट्रपती आणि इंग्लंडचे पंतप्रधान सुद्धा आहेत. भारताने या देशांशी चांगले आर्थिक संबंध जोपासल्याबद्दल हे देश आभार मानतात. जग मंदीच्या काळातून जात असताना आपला देश जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला आहे. अशावेळी जॉर्ज सोरोस सारखे लोक भारताच्या लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉर्ज सोरोस यांनी केलेली ही मागणी म्हणजे त्यांना वाटत असेल की आपण मोदींना भारतात झुकवू शकतो. मात्र लोकशाही पद्धतीने निवडलेल्या आपल्या सरकारने अशा उद्योजकांना ठोस उत्तर दिलंच पाहिजे. qहडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक गौतम अदाणी यांना मोठा झटका तर बसलाच शिवाय विरोधकांना मोदी सरकारविरोधात बोलण्यास एक मुद्दाही मिळाला. राहुल गांधी यांनी मागच्याच आठवड्यात लोकसभेत केलेल्या भाषणात सरकारला अदाणी प्रकरणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकरणी चौकशी करावी अशीही मागणी विरोधकांनी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात अदाणी हे नावही उच्चारलं नाही. त्यानंतर आज अमेरिकेतले अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी मोदींवर टीका केली आहे. तसंच अदाणी प्रकरणामुळे मोदींना त्यांचं पद गमावावं लागू शकतं असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर भाजपाने जॉर्ज सोरोस यांना खडे बोल सुनावले आहेतच तर दुसरीकडे काँग्रेसनेही आता सोरोस यांनी आमच्या देशाच्या प्रश्नात नाक खुपसू नये असं म्हटलं आहे.