नवी दिल्ली, दि.१७। बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ qशदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ qशदे यांना दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वीच आज निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ qशदेंनी शिवसेनेच्या ४० आमदारांना घेत मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकनाथ qशदे यांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला, तर उद्धव ठाकरेंनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले. त्यावर आयोगाने आज निर्णय दिला. त्यात निवडणूक आयोगाने धनुष्यबाणासह शिवसेना एकनाथ qशदेत्यात निवडणूक आयोगाने धनुष्यबाणासह शिवसेना एकनाथ qशदे यांच्याकडे सोपवली आहे. एकनाथ qशदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांची आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांचा हा विजय यासोबतच हा लोकशाही आणि जनतेने आम्हाला दिलेल्या पाठबळाचा विजय आहे. आमचे सरकार घटनेच्या आधारावर कायद्याने स्थापन झाले. आजचा निर्णय मेरीटवर दिलेला निर्णय आहे. हा निर्णय दिल्याबद्दल निवडणूक आयोगाला मी धन्यवाद देतो. हा बहुमताचा, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे. हा सत्याचा विजय आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार?
याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. यानंतर आता याबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानुसार पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ qशदे यांना देण्यात आले आहे. ठाकरे गट आणि qशदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. परंतु, आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव qशदे गटाला मिळाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असे मानले जात आहे.ट पक्षचिन्हाच्या हक्काबाबत १२ डिसेंबर २०२२ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. त्याला ठाकरे आणि qशदे गटाचे प्रतिनिधी हजर होते. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची ङ्कौज हजर होती. निवडणूक आयोगाने एकनाथ qशदे गटालाच खरी शिवसेना मानली आहे. आयोगाने शुक्रवारी संध्याकाळी qशदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. आयोगाला उद्धव गटाच्या पक्षाची रचना अलोकतांत्रिक असल्याचे आढळून आले. यामध्ये कोणतीही निवडणूक न घेता लोकांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक आयोगाला असेही आढळून आले की शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे अलोकतांत्रिक प्रथा परत आणल्या गेल्या आणि पक्षाला खाजगी जागेवर आणले. या पद्धती निवडणूक आयोगाने १९९९ मध्ये नाकारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेतील उद्धव गटाचा दावा संपला आहे.