मुंबई, दि.२०। प्रतिनिधी शिवसेनेच्या ५६ आमदारांना प्रतोदांनी दिलेला व्हीप पाळावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशाराच शिरसाट यांनी दिला आहे. शिवसेनेच्या ५६ आमदारांनी अधिवेशनाला उपस्थिती असावी, प्रतोदांच्या सूचनेचे शिवसेनेचे सर्व आमदारांनी पालन करावे, ५६ आमदारांना व्हीप लागू राहणार असल्याचेही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. पक्ष निधीसाठी आमची लढाई नाही, तर शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर असून त्यावर आम्ही हक्क सांगणार नाही, असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ही लढाई काही पार्टी फंड किंवा शिवसेना भवन मिळविण्यासाठी नव्हते. पक्षाचे चिन्ह आणि नाव महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही पक्षकार्यालयातील बैठक घेतली आहे. तर शिवसेना भवनवर आम्ही हक्क सांगणार नाही असे आम्ही आधीच जाहीर केले होते. कुणाला ती संपत्ती वाटत असली तरी ते आमच्यासाठी मंदिर आहे. तिथून आम्ही जेव्हाही जाऊ तेव्हा त्यास नमन करू असे संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
शिरसाट म्हणाले की, ज्यांना पैशाचा लोभ आहे त्यांनी ते करावे, त्यांच्याशी आमचे ते देणेघेणे नाही. एकीकडे शिवसैनिकांना पाळीव कुत्रा जो संबोधतो त्यांचे ते काम आहे असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या शाखेच्या जागा काही कुणी विकत घेतल्या नाही, ज्या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या संपत्ती आहे ती त्यांचीच राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संजय सिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे, हे त्यांना माहिती नाही. त्यांच्या निलंबनासाठी आम्ही आजच्या बैठकीत चर्चा केली आहे, त्यावर निश्चित कारवाई करण्यासाठी आम्ही करणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर संजय राऊतांवर बोलून स्वत: वर चिखल उडवून घेणार नाही. हत्ती चले बाजार तर कुत्ते भोके हजार असा टोला संजय राऊत यांना टोला लगावला आहे.