मुंबई : आमदार, खासदारानंतर शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण ि च न् ह गेल्यामुळे उद्धव ठ ा क र े अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता ठाकरेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर केल्याचा आरोप यशस फर्मकडून करण्यात आला आहे. यशस फर्मच्या योगेश देशपांडे यांनी शिवाई ट्रस्टविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे ठाकरेंच्या हातातून सेनाभवनही जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.