मुंबई, दि.२०। प्रतिनिधी उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पण ते ट्रॅपमध्ये अडकले असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. एबीपी माझाला दिलेल्या शुलर्श्रीीर्ळींश मुलाखतीत भगत सिंह कोश्यारी यांनी अनेक खळबळजनक वक्तव्यं आणि दावे केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडले. त्याशिवाय पहाटेचा शपथविधी, १२ आमदारांची नियुक्ती आणि बऱ्याच मुद्द्यांवर राज्यपालांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पण ते ट्रॅपमध्ये अडकले. उद्धव ठाकरेंना राजकारण किती कळतं, हे मी नाही सांगू शकत नाही. कुणाचा ट्रॅप होता?, हे मला माहिती नाही.
डोक्यानं विचार केला असता तर असं झालं नसतं, असे कोश्यारी म्हणाले. माझे कुणाशीही संबंध खराब झाले नाहीत. भुजबळ, अजित पवार सर्वांशी संबंध चांगले आहेत. आदित्य ठाकरे तर मला माझ्या मुलासारखे आहेत. मी चांगल्यावाइर् टासाठी काम करत नाही. मी कामासाठी काम करतो, असे कोश्यारी म्हणाले. जिथे त्यांची चूक झाली तिथे मी बोललो. महाराजांबाबत दुसऱ्या दिवशीच स्पष्टीकरण दिलं. मी लगेच निर्णय घेतला तर अडचण, मी निर्णय लगेच नाही घेतला तरी अडचण, असे कोश्यारी म्हणाले.