मुंबई, दि.२१। प्रतिनिधी पठान चित्रपट प्रदर्शित होऊन २७ दिवस झाले आहेत. आज या चित्रपटाचा २८वा दिवस आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली होती. तर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. तर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्ड बनविले आहेत. हा चित्रपट १००० कोटींच्या यादीत समाविष्ट होण्यापासून काही करोडोंनी दूर होता. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘पठान’ चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिस दबदबा आहे.
या चित्रपटामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना दणका बसला आहे. तर ‘पठान’समोर कार्तिक आर्यनची देखील जादू चालली नाही. परंतु या चित्रपटाला १००० कोटींपर्यंत यायला वेळ लागला. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर २७ व्या दिवशीही कार्तिक आर्यनच्या शेहजादापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.