मुंबई हल्ल्याचे आरोपी तुमच्या देशात खुलेआम फिरतायत!

लाहोर, दि.२१। वृत्तसंस्था लाहोरमध्ये प्रसिद्ध उदर्ू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात जावेद अख्तर बोलत होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे खुलेआम फिरत आहेत. उदर्ू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरला पोहोचले होते. अख्तर यांच्या या वक्तव्याचे अभिनेत्री कंगना रनोटनेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री कंगनावर स्वतः जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केलेला आहे. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही परत जाल तेव्हा तुमच्या लोकांना सांगाल की, पाकिस्तानी चांगले लोक आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अख्तर म्हणाले – आपण एकमेकांवर आरोप करू नये. यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. मुंबईवर कसा हल्ला झाला ते आपण पाहिले आहे. ते दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ते दहशतवादी तुमच्याच देशात मोकळेपणाने फिरत आहेत. त्याविरोधात भारतीयांनी तक्रार केली आहे त्यांना याचा त्रास आहे. पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जावेद अख्तर यांच्यासोबत दिसत आहे. जावेद अख्तर यांनी लिहिलेले एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे अली गाताना त्यात दिसतोय. अली जफरसोबत जावेद अख्तरही गाताना दिसले. या मेळाव्यात इतर पाकिस्तानी कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *