बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यामुळे आगीत तेल; चीनचा आरोप

बीजिंग, दि.२१। वृत्तसंस्था रशिया-युक्रेन युद्धाला ४ दिवसांनंतर १ वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सोमवारी अचानक कीव्हला पोहोचले. बायडेन यांनी या दौऱ्याद्वारे रशियाला कठोर संदेश दिला आहे. ते म्हणाले – अमेरिका युक्रेनच्या पाठिशी आहे. हे झेलेन्स्कींर्ना सांगण्यासाठी मी आज कीव्हला आलो आहे. बायडेन यांच्या दौऱ्यावर आता संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले – काही देश आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. हे तत्काळ बंद झाले पाहिजे. यामुले हे युद्ध अधिक धोकादायक व नियंत्रणाबाहेर जात आहे.

रशियाने अद्याप बायडेन यांच्या दौऱ्यावर अधिकृत भाष्य केले नाही. पण बायडेन यांच्या या कृतीमुळे तेथील लष्करी तज्ज्ञांमध्ये खळबळ माजली आहे. उछछ च्या वृत्तानुसार, रशियाचे सुप्रसिद्ध पत्रकार सर्गे ई मरदन यांनी टेलिग्राम चॅनलवर लिहिले की, बायडेन यांचा युक्रेन दौरा रशियासाठी लज्ज्ाास्पद आहे. बहाद्दरीच्या गोष्टी केवळ मुलांसाठी सोडल्या पाहिजेत. दुसरीकडे, रशियाच्या फेडरल सेक्युरिटी सर्व्हिसचे माजी अधिकारी इगोर गिरकीन यांनी बायडेन यांचा उल्लेख दादाजी म्हणून केला आहे. ते म्हणाले की, युद्धाच्या मैदानात येऊन सुखरूप परत जाणे बायडेन यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. त्यांना चिथावण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या एका टेलीग्राम चॅनलवर एक अधिकारी म्हणाला की, पुतीन यांच्यापूर्वीच बायडेन कीव्हला पोहोचले. युद्धाला १ वर्ष होत आहे. आम्हाला कीव्हमध्ये अमेरिका नव्हे तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना पहायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *