पुणे, दि.२१। प्रतिनिधी पुणे नगर महामार्गावर फलके मळ्यानजीक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अपघात दोन वर्षाच्या लहान मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर कारेगाव जवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने इंडिकाइंडिका कारने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.
ही धडक इतकी जोरदार होती की, या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व कुटुंब हे बीड जिल्ह्यातील आहेत, ज्यामघ्ये एका दोन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. एकाच कुटूंबातील चौघांना अपघातात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. असून मदतकार्यास सुरूवात झाली आहे.