मुंबई, दि.२१। प्रतिनिधी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच या शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत अजून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे क्शन मोडवर आले असून या पोर्शभूमीवरच आज राष्ट्रीय कार्यकारणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. तसेच शिवसेनेची पुढची वटचाल कशी असेल? या विषयावर चर्चा झाली असून एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली. शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील. चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय.