सत्तासंघर्षावर आज पुन्हा “सर्वोच्च’ सुनावणी

नवी दिल्ली, दि.२१। प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींसमोर आजपासून पुन्हा सलग ३ दिवस सुनावणी सुरू झाली. आज ठाकरे गटाचे वकिल अ्ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आता या प्रकरणात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आज पूर्णवेळ कपिल सिब्बल यांनीच युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता पक्ष आणि चिन्हावर निर्णय दिला असे ठाकरे गटातर्फे त्यांनी म्हणणे मांडले.शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्षांतर बंदी कायदा या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून पुन्हा युक्तिवाद करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणात अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ लागू होतो की नाही, यावरही ठाकरे व शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.

सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुरुवात होताच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. हे प्रकरण याच ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ऐकू. तसेच, हे प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक महत्त्वाचे उदाहरण ठरेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. अध्यक्ष हे घटनात्मक पद विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. कोर्ट त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, १० व्या सुचीचे अधिकार म्हणजेच कोणाला अपात्र ठरवायचे, याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. कोर्टाला तो अधिकार नाही. तसेच, विधानसभा अध्यक्षांबाबत ठाकरे गटाचे वकील अ्ॅड. कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याचे चंद्रचूड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *