मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांमध्ये गुजरातीत आरक्षण अर्ज

भाईंदर, दि.२६। प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या मराठी राजभाषेला रेल्वे प्रशासनाकडून हरताळ फासण्याचे काम सध्या भाईंदर व मिरारोड रेल्वे स्थानकात सुरू आहे. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयात इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असताना देखील मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात प्रवाशांना आपले तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना इंग्रजीसह गुजराती भाषेतील आरक्षण अर्ज दिला जात आहे.

यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत मनसेने मराठी भाषेत आरक्षण फॉर्म उपलब्ध करून देण्याची मागणी करत त्यामुळे मनसेने मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अन्यथा मनसेकडून रेल्वे प्रशासनालामनसेकडून रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे. मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मीरारोड व भाईंदर या रेल्वे स्थानकांमध्ये आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रांवर नागरिकांची गर्दी झालेली असते. यावेळी आरक्षणासाठी आलेल्या नागरिकांना तिकीट आरक्षणासाठी दिलेला अर्ज हा अनेकदा इंग्रजीत आणि गुजराती भाषेत असतो. त्यामळे मराठी भाषिक असणाऱ्या नागरिकांना तो अर्ज भरणे अवघड जाते. त्यामुळे मराठी भाषिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *