मुंबई, दि.२६। प्रतिनिधी राज्यातील राजकारण विविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे. या पोर्शभूमीवर विरोधक महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजे कमकुवत असणाऱ्यांशीच तुम्ही लढणार का? याला भ्याडपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आम्हाला सत्याग्रही म्हणता, पण तुम्ही सत्ताग्राही आहात, असे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात बोलताना म्हटले आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एक गोष्ट विचारायची आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. मागच्या काळातमागच्या काळात उद्धव ठाकरे यांची मजबुरी होती. त्यांना सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करायचे तरी उद्धव ठाकरे मूग गिळून बसायचे. मात्र आता तुमची काय मजबुरी आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिना चालणार आहे. या अधिवेशनात ८ मार्च रोजी आर्थिक सर्वे क्षणाचा अहवाल सादर करण्यात येईल. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच विरोधकांनी लोकायुक्तसारखा कायदा मंजूर करण्यासाठी मदत करावी. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.