मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतपिकांचेही नुकसान

मुंबई, दि.०७। प्रतिनिधी तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काल रात्री पुणे, मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील कल्याण डोंबिवली, जळगाव, नाशिक तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक आणि जळगावमधील बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *