एक दिवस शिमगा ठीक, पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसांसारखे वागावे

मुंबई, दि.०७। प्रतिनिधी राज्यासह देशभरात होळी आणि धुळवडीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी, नेते मंडळी होळी आणि धुळवडीचा आनंद लुटला. यातच राजकीय नेत्यांमध्येही आरोपप्रत्य ारोप होताना दिसत आहेत. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजप कार्यालयात धुलिवंदन साजरे केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना राजकीय फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. एक-दोन लोकांनाच सल्ला द्यायचाय की, होळीच्या दिवशी आपल्याकडे शिमगा करण्याची पद्धत आहे. पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. मला त्यांना सांगायचे आहे की, एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसांसारखे वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. होळीला आमच्या काही मित्रांना खोटे सांगून भांग वगैरे पाजून दिली नेक वेळा होळीला आमच्या काही मित्रांना खोटे सांगून, भांग वगैरे पाजून दिली. त्यानंतर दिवसभर त्यांचे जे काही चालले होते, कुणी गाणे म्हणत होते. कुणी रडत होते.

हे सगळे पाहून मजा आली. पण असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. तसेच आम्ही विधानसभेत सांगितले होते की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की, आम्ही त्या सगळ्यांना माफ केले. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *