मुंबई, दि.०९। प्रतिनिधी मुंबई अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून “पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प १३,४३७ कोटी रुपयांचा आहे. आजच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, या घोषणा म्हणजे गाजरचा हलवा असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, या अर्थसंकल्पूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प महाविकास आघाडीने मांडले होते. अजित पवार तेव्हा अर्थमंत्री होते.उद्धव ठाकरे म्हणाले की, या अर्थसंकल्पूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प महाविकास आघाडीने मांडले होते. अजित पवार तेव्हा अर्थमंत्री होते. परिस्थिती कशी होते माहितेय.
कोरोनाचं संकट होतं. केंद्र सरकार आमच्या बाजूचं नव्हतं. २५ हजार कोटीपेक्षा अधिक जीएसटीची थकबाकी असायची. सहा महिने झाले आहेत. महाशक्तीचं पाठिंबा असलेलं सरकार राज्यात कारभार कसं करतंय माहितेय. अवकाळी पावासामुळे बांधावर पंचनामा करायला एकही अधिकारी गेलेला नाही. आजचा अर्थसंकल्प पाहिल्यावर सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा आणि भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबईत गडगडाट झाला पण पाऊस पडला नाही. त्यामुळे गरजेल तो बरसेल काय? असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पाचं मी गाजर हलवा असं वर्ण करेन. आम्हीच जाहीर केलेल्या योजनांचं नामांतर करून या योजना पुढे मांडल्या आहेत. आपला दवाखाना योजनेमुळे त्यावेळी यांना फिता कापायचे भाग्य मिळायंच. तीच योजना आज राज्यात राबवणार आहेत. शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांची भरघोस मदत केली. पण त्यांनाहमखास भाव कसा मिळणार याबाबत वाच्यता नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.