फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला !

मुंबई, दि.०९। प्रतिनिधी मुंबई यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस होता. भरीव निधीची तरतुद एवढीच काय ती घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ठोस असे काही नाही, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यात विविध घोषणा राज्य शासनाच्यावतीने करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर टीका करताना अजिया अर्थसंकल्पावर टीका करताना अजित पवार म्हणाले, आम्ही करणार आहोत. देणार आहोत, एवढचं काय ते त्यांनी सांगितले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांना स्वप्नांच्या नगरीत फिरवून आणल्यासारखे आहे. अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ होता. बेरोजगार, उद्योग, शेतीसाठी काय करणार याची तरतूद अर्थसंकल्पात नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंचसुत्रीचा अर्थसंकल्प आम्ही सादर केला. या सरकारने मात्र पंचामृताचा अर्थसंकल्प सादर केला. आपण कधी पंचामृत बघितलेले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्पही कधीच दिसणार नाही. भविष्याचे कोणतेही नियोजन नसलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.त पवार म्हणाले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *