आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिले नाही ! सगळे स्वत:च खाल्ले

मुंबई, दि.०९। प्रतिनिधी आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिले नाही; सगळे स्वत:च खाल्ले असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दोन शब्दांत वर्णन करायचे त्याचे ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प, असे वर्णन करता येईल असे म्हटले होते. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आकडे फुगविण्यासाठी आम्ही बजेट मांडला नाही. आम्ही काही शिल्लक ठेवले नाही. बजेटचे आकडे पाहिल्यानंतर त्यांना (विरोधी पक्षांना) बोलायला काही नव्हते. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे, असा टोला लगावला. तर राज्यातील जनतेसाठी आपण ७०० नवीन आपला दवाखाना सुरू करतोय असे सांगतानाच आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा राज्य सरकारचा बजेटमध्ये प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *