राजकारण

अंबरनाथ–अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड; सत्तेसाठी ओवैसींचा MIMही चालतो—भाजपाचे नैतिक अधःपतन : हर्षवर्धन सपकाळ

विशेष प्रतिनिधी :महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपाची कथनी आणि करणीतली विसंगती पुन्हा एकदा उघड झाली आहे. अंबरनाथ आणि अकोटमधील राजकीय समीकरणांमुळे भाजपाचा दुतोंडी चेहरा समोर आला असून, सत्तेसाठी भाजपाला कोणताही पक्ष चालतो—अगदी ओवैसींचा MIM सुद्धा, अशी जोरदार टीका यांनी केली.

जालना येथे महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी अंबरनाथमधील घडामोडी, अकोटमधील युती, तसेच सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या बिनविरोध प्रक्रियेवरून भाजपावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.

काँग्रेसची कारवाई, भाजपाची पाठराखण

अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षाशी कोणतीही चर्चा न करता घेतलेली भूमिका पक्षाच्या तत्त्वांना धरून नसल्याचे स्पष्ट करत, काँग्रेसने क्षणाचाही विलंब न लावता त्या १२ नगरसेवकांना बडतर्फ केले, असे सपकाळ यांनी सांगितले.
मात्र दुसरीकडे, ने या नगरसेवकांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना आपल्या गोटात सामावून घेतले. “यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले, “अंबरनाथमध्ये काँग्रेस भाजप व शिंदेसेनेविरोधात लढली आणि १२ नगरसेवक निवडून आले. पण भाजपाने ‘अंबरनाथ विकास आघाडी’साठी थेट पक्षाच्या लेटरहेडवर पत्र जारी केलं. काँग्रेसने त्वरित कारवाई केली; मात्र मुख्यमंत्री यांनी केवळ एक विधान करून विषय संपवला. भाजपाच्या कथनी आणि करणीत स्पष्ट फरक आहे.”

अकोटमध्ये भाजप–MIM युतीचा आरोप

सत्तेसाठी भाजप कोणत्याही तडजोडीला तयार असल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले, “अकोटमध्ये भाजपाने म्हणजेच ओवैसींच्या पक्षाशी युती केली. काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणारा भाजप आता स्वतःच काँग्रेसयुक्त होत चालला आहे.”

‘महापुरुषांचे विचार पुसण्याचा भाजपाचा अजेंडा’

भाजपाच्या मानसिकतेवर प्रहार करताना सपकाळ म्हणाले की, “भाजपाला सत्तेचा माज आला आहे. महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्यांची नावे पुसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.”
लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी माजी मुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत, “यातून भाजपाचा अहंकार स्पष्ट दिसतो,” असे ते म्हणाले.

नांदेडच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या उपस्थितीत केलेल्या वक्तव्यावरूनही सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“भाजपाची ही मानसिकता ओळखा. त्यांना केवळ नेतेच नाही, तर शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांचे विचारही पुसायचे आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

‘बिनविरोध’ मागे दमदाटी आणि पैशांचे आमिष

राज्यात मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक बिनविरोध होत असल्यावर बोलताना सपकाळ म्हणाले, “हे लोकप्रियतेमुळे नाही. दमदाटी, धमक्या आणि पैशांचे आमिष दाखवून हे घडवले जात आहे. पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोगही अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचे दिसते. हा प्रकार लोकशाही आणि संविधानासाठी अत्यंत घातक आहे.” या पत्रकार परिषदेला खासदार , प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष , जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अंबरनाथपासून अकोटपर्यंत उलगडलेली ही राजकीय गणिते केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून, भाजपाच्या सत्ताकेंद्रित राजकारणावर थेट बोट ठेवणारी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
“अशा अहंकारी आणि दुटप्पी भाजपाला जनतेने धडा शिकवावा,” अशी थेट हाक देत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *