श्रीलंकेच्या नौदलानं १६ भारतीय मच्छिमारांना पकडलं

श्रीलंक ा, दि.१३। वृत्तसंस्था श्रीलंकेच्या नौदलानं १६ भारतीय मच्छिमारांना पकडलं आहे. श्रीलंकेच्या नौदलाने दोन बोटींसह १६ भारतीय मच्छिमारांना त्यांच्या समुद्री क्षेत्रात अवैध मासेमारी केल्याप्रकरणी अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने अवैध शिकार करणाऱ्या १६ भारतीय मच्छिमारांसह दोन ट्रॉलर बोटी जप्त केल्या आहेत. श्रीलंकेच्या नौदलानं सांगितलं की, १२ मार्च रोजी श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात शिकार करणाऱ्या बोटींचा मागोवा घेण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली होती. या कारवाईअंतर्गत श्रीलंकेच्या जलक्षेत्रात मासेमारी करणाऱ्या दोन बोटींसह १६ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेने पकडलेल्या १६ भारतीय मच्छिमारांपैकी चार मच्छिमार पुडुकोट्टई जिल्ह्यातील आणि १२ मच्छिमार नागापट्टिनममधील आहेत. श्रीलंकेच्या नौदलाने अनलाईथीवूमध्ये ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या देशातील अधिकाऱ्यांकडे सोपवलं आहे, असं श्रीलंकेच्या नौदलाने सांगितलं.

या प्रकरणाबाबत तामिळनाडू भाजपचे प्रमुख अन्नामलाई यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भारतीय मच्छिमारांच्या सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी पत्र लिहिलं आहे. त्यांना सांगितलं की, श्रीलंकेच्या नौदलाने १६ मच्छिमारांना अटक केली आहे. अटकेदरम्यान त्यांच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. या मच्छिमारांना लवकरात लवकर भारतात सुरक्षित परत आणण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडे पत्राद्वारे विनंती केली आहे. मच्छिमारांच्या अटकेचा निषेध पीएमकेचे नेते एस. रामदास यांनीही भारतीय मच्छिमारांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यांना ट्वीट करत म्हटलं आहे की, श्रीलंकेकडून तामिळनाडूच्या मच्छिमार आणि त्यांच्या बोटी वारंवार पकडल्या आणि जप्त केल्या गेल्या जात आहेत, यामुळे मोठं नुकसान होतं. एक बोट जप्त केली तर सुमारे १०० सदस्य असलेली किमान २० कुटुंबं बाधित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *