अमरावती, दि.14(प्रतिनिधी): अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वात यशस्वी झालेल्या कश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रेनंतर आता राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरुन अमरावती शहर-जिल्ह्यामध्ये ‘हात से हात’ जोडो अभियान राबविण्यात येत आहे. अमरावती शहरात मंगळवार 14 मार्च पासून या अभियानाला सुरुवात झाली.
भारत जोडो यात्रेतून देशभर जो स्नेहभावाचा, विमर्श निर्माण करुन आम्ही तुमच्या सोबत आहोत असा भक्कम विश्वासाचं संदेशसुध्दा नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा हातसे हात जोडो अभियानाला एक महत्वपुर्ण घटक असणार आहे.
मंगळवारी रहाटगाव चौकातून या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे शहरअध्यक्ष बबलू शेखावत, माजी मंत्री डॉ.सुनिल देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी नगरसेवक गोपाल धर्माळे, विजय वानखडे, डॉ.अंजली ठाकरे, मैथिली पाटील, युवक काँग्रेसचे संकेत कुलट, निलेश गुहे, जयश्री वानखडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते पायदळ यात्रेमध्ये सामील झाले होते.