मुंबई, दि.१६। प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती असून, तो सात आठ वर्ष झालं फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. याची एक मुलगी २०१५-१६ दरम्यान पत्नीला भेटत होती. नंतर अचानक भेटणं बंद झालं. २०२१ साली पुन्हा तिने पत्नीला भेटणं चालू केलं. तेव्हा तिने सांगण्यास चालू केलं, मी डिझायनर आहे, कपडे आणि दागिने तयार करते.
विेशास संपादन करण्यासाठी तिच्या आईचं एक पुस्तकही तिने प्रकाशन करून घेतलं. एक दिवशी तिनं सांगितलं, माझ्या वडिलांना काही चुकीच्या गुन्हा अडकवण्यात आलं आहे, त्यांना सोडवा. त्यावर पत्नीने काही असेल तर मला निवेदन देण्यास सुचवलं. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपयांची ऑफर दिली. मात्र, चुकीचं अडकले असतील, तर पोलिसांकडून सोडवता येईल, असं पत्नी म्हणाली. पण, तिने सातत्याने बुकींर्चा विषय काढल्यावर पत्नीने तिला फोनवर ब्लॉक केलं. ब्लॉक केल्यावर दोन दिवसांनी अनोळखी नंबरवरून काही व्हिडीओ आणि क्लीप आल्या, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. यातील एक व्हिडीओ गंभीर होता. त्यात ही मुलगी बाहेर कुठेतरी बॅगेत पैसे भरत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ती मुलगी आमच्या घरातील महिला कर्मचाऱ्याला बॅग देताना दिसत आहे. नंतर पत्नीला त्या व्यक्तीने धमकी दिली की, हे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू. माझे सर्व पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला मदत करत तात्काळ केसेस परत घेण्याची कारवाई करा. ही गोष्ट पत्नीने सांगितल्यावर आम्ही तातडीने गुन्हा दाखल केला.