मुंबई, दि.१६। प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे. काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत मोर्चा तूर्तास त्याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, माजी आमदार कॉम्रेड जे. पी. गावित, किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले, माकपचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते आणि माकपचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, ‘सीटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड हे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते शेतकऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिली. शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत आणि त्यांच्या मागण्यांबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करणार आहेत, असेही सत्तार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याच्या माहितीला आमदार विनोद निकोले यांनी दुजोरा दिला. शेतकऱ्यांचा मोर्चा तर्ू्तास वाशिंद येथेच थांबणार आहे. जोपर्यंत मागण्यांवर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मोर्चातून माघारी जाणार नाही. मागील मोर्चाचा अनुभव आहे, ओशासन दिले जाते. मात्र अंमलबजावणी केली जात नाही. यावेळी ओशासनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही. अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिली आहे, असे किसान सभेचे गावित म्हणाले.