भाजपची राहुल गांधी यांनी माफी मागण्यासाठी नारेबाजी

नवी दिल्ली, दि.१७। वृत्तसंस्था संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील ५ व्या दिवसाचे कामकाज अवघ्या २० मिनिटांत गुंडाळण्यात आले. सभागृहातील नारेबाजीमुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. तत्पूर्वी, काँग्रेस खासदारांनी राहुल गांधी यांना बोलू देण्याच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. तर सत्ताधारी भाजपचे सदस्य मागील ४ दिवसांपासून राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील भाषणाप्रकरणी माफीची मागणी करत आहेत. राज्यसभेचे कामकाजही सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. दुसरीकडे, सभागृह तहकूब झाल्यानंतर काँग्रेस खासदारांसह १६ विरोधी पक्षांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खरगे यांच्यासोबत संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ अदानी प्रकरणी सरकारविरोधात निदर्शने केली. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी राज्यसभेत सोनिया व राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाचा प्रस्ताव दाखल केला.

खासदार शशी थरुर म्हणाले – भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी परकीय शक्तींर्नी आमच्या देशात यावे असे राहुल गांधी केव्हाच म्हणाले नाही. ही निराधार गोष्ट आहे. यासाठी माफी मागण्याची काहीच गरज नाही. संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे. दुसरीकडे, भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली आहे. भाजपच्या निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचीही मागणी केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आजचा ५ वा दिवस आहे. यापूर्वीच्या ४ दिवसांत राहुल गांधींचे लंडन स्थित केंब्रिज विद्यापीठातील भाषण व अदानी प्रकरणी तीव्र गदारोळ झाला होता. खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. दुबे म्हणाले की, राहुल गांधी यांनी युरोप व अमेरिकेतील आपल्या विधानांमुळे सातत्याने संसद व देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांना संसदेतून निलंबित करण्याची वेळ आली आहे. त्यांचे लोकसभा सदस्यत्व समाप्त करण्यात मदत केली जावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *