तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी?

 मुख्यमंत्री केजरीवालांचे सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रनवी दिल्ली, दि.२० वृत्तसंस्था अरविंद केजरीवाल यांनी ५ मार्चला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पत्र लिहित स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे. तर, तेलंगणाचा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी आरोग्याचं कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी केसीआर यांनी बिगर भाजपा आणि काँग्रेसचं सरकार बनवण्याची घोषणा केली होती. पण, अन्यही पक्षांनी यात आघाडी घेतल्यावर त्यांनी आरोग्याचं कारण देत जाणं टाळल्याचं सांगितलं जातं. केसीआर सध्या आपला पक्ष भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) अन्य राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी “एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितलं, राहुल गांधी विदेशात केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागत नाहीत. त्यामुळे भाजपा संसद चालू देत नाही आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसला समोर करत भाजपाला संसद चालू द्यायचं नाही आहे. राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा बनावा, असं भाजपाला वाटतं. कारण, याचा फायदा भाजपाला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *