मुंबई, दि.१३। प्रतिनिधी उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये जनादेशाची हत्या केली आहे. रात्रंदिवस युतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विेशास तोडण्याचे काम केले. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला. मात्र, असा अन्याय ज्या-ज्या वेळी होईल, त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. भाजपच्या वतीने आयोजित मिशन २०२४ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २०१९ मध्ये युती तुटण्यामागील कारणे सांगत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तर आता नव्याने शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या युतीवर कौतुकाचा वर्षात करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी देखील केलेल्या युतीमागील निती सर्वांसमोर माडंली.