३ रेल्वे अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

भुवनेेशर, दि.१६। प्रतिनिधी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेप्रकरणी भुवनेेशर येथील विशेष न्यायालयाने तीन आरोपी रेल्वे अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. ११ जुलै रोजी तिघांच्याही कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. आरोपींविरुद्ध कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), २०१ (पुरावा नष्ट करणे) आणि रेल्वे कायद्याच्या कलम १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिघांची सीबीआय कोठडी शुक्रवारी संपली, त्यानंतर त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होणार आहे.भुवनेेशरपासून १७५ किमी अंतरावर बालासोर येथील बहनगा बाजार स्थानकाजवळ २ जून रोजी सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला.२ जून रोजी बालासोर येथील बहनगा बाजार स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात २९३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि १,००० हून अधिक लोक जखमी झाले होते. रेल्वेने १२ जुलै रोजी ७ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. यामध्ये अटक करण्यात आलेल्या ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.दक्षिण पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार मिश्रा म्हणाले की, हे अधिकारी सतर्क असते तर ही दुर्घटना घडली नसती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *