यमुना नदी १३ वर्षांनंतर ताजमहलपर्यंत पोहोचली

नवी दिल्ली, दि.१९। वृत्तसंस्था देशात मान्सूनचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. आता मान्सून ‘नॉर्मल’ झाला आहे. १ जून ते १८ जुलैपर्यंत ३२१.८ मिमी पाऊस पडला, तर सरासरी ३२३.१ मिमी. मात्र, ज्या दक्षिणेकडील राज्यांतून मान्सून दाखल झाला, त्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पाऊस झाला आहे. डोंगराळ भागातील पावसामुळे यमुना नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली असून आग्ऱ्याच्या ताजमहालापर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशात मान्सूनच्या प्रवेशाला २५ दिवस पूर्ण झाले आहेत. ३५० मिमी (१४ इंच) पाऊस पडला, जो ३००.७ सरासरीपेक्षा १७% जास्त आहे. राजस्थान, हिमाचल, पंजाब, हरियाणा यांसारख्या उत्तर आणि उत्तर-पश्चिमी राज्यांवर मान्सूनने सर्वाधिक कृपा केली आहे. सरासरीपेक्षा ४३ टक्के जास्त पाऊस झाला.

हिमाचलमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा ८८% आणि उत्तराखंडमध्ये २६% जास्त पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे या दोन राज्यांच्या तुलनेत राजस्थानमध्ये दुप्पट पाऊस झाला. सरासरीपेक्षा १०२% जास्त पाऊस झाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगडमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पूर येऊ शकतो. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, २१ ते २३ जुलै दरम्यान पावसाचा जोर थोडा मंदावू शकतो. पूर आणि पाऊस आणि संबंधित घटनांमुळे देशात ३०० हून अधिक मृत्यू झाले आहेत. १२ राज्यांमधील २१ जिल्ह्यांमध्ये ६०% पर्यंत पावसाची कमतरता आहे. बिहारमधील २९, उत्तर प्रदेशातील २५, महाराष्ट्रातील १८, कर्नाटकातील १७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *