मुंबई, दि.१९। प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरांत सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडाली आहे. मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल सेवा रुळांवर पाणी साचल्यामुळे विस्कळीत झाली आहे. याचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक डोंबिवली ते कसारा-कर्जपर्यंत पूर्णतः ठप्प झाली आहे.