नागपूर जिल्हा भिवापुर

भिवापूर कृउबा समिती पदाधिकाऱ्याची हिंगणघाट बाजार समितीला भेट

भिवापूर ( प्रतिनिधी ):भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवून विवीध उपक्रमाची माहिती घेतली.
एक दिवसीय आयोजित भेट दौऱ्या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेतकऱ्यांची संस्था अशी हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यावेळी हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीरबाबू कोठारी यांच्या हस्ते भिवापूर बाजार समितीचे सभापती बाळू इंगोले, संचालक गजानन गावंडे, सुशिल मेश्राम, नगरपंचायत नगरसेवक पिंटू श्रीरामे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे जेष्ठ संचालक मधूसूदन हरणे, उत्तमराव भोयर, राजूभाऊ मंगेकर, पंकज कोचर व संजय कात्रे उपस्थित होते.
सभेदरम्यान ॲड सुधीर कोठारी यांनी बाजार समितीत शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा प्रभावीपणे कशा देता येतील याबाबत मार्गदर्शन केले. बाजार समितीच्या यार्ड मध्ये शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून मोठी आवक असतानाही शेतकऱ्यांना कोणतीही अडचन भासत नाही अशी माहिती त्यांनी दिली.
हिंगणघाट कृउबा समिती प्रमाणेच
विवीध सुविधा व उपक्रम भिवापूर कृउबा समिति मध्ये राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा सभापती बाळू इंगोले यांनी व्यक्त केली भेटीदरम्यान मिळालेल्या आदरतिथ्याबद्दल सभापती संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे आभारही त्यांनी मानले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *