चिखली वडद ग्रामवासी यांचा पत्रपरिषदेत कडक इशारा
० ५ किमी चा डांबरी रस्ता पूर्ण करण्याची मागणी
भिवापूर ( राजेश जांभुळे ):भिवापूर ते चिखली हा रस्ता नागपूर जि.प. बांधकाम अंतर्गत येत असून हा डाबरी रस्ता पुर्णपणे उखळला असून येथून दुचाकीने ये जा करणाऱ्याचे अपघात होवून बरेच जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत मागील दोन वर्षापासून सर्वांना निवेदन दिले परंतु याबाबत कोणतीही दखल न घेतल्यामुळे सरपंच प्रणाली गारघाटे ,उपसरपंच गणेश फुलबांधे व ग्रामवासी यांनी आयोजित शासकीय विश्रामगृह येथे दि. ३१ डिसेंबरला दुपारी पत्रपरिषद घेत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीत बहिष्कार टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
भिवापूर ते चिखली हा नागपूर जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत येत असलेला ५ कि.मी. हा रस्ता चंद्रपूर जिल्हाला जोडणार महत्वपूर्ण रस्ता आहे. हा रस्ता पुर्णपणे उखळला असून येथून दुचाकीने ये जा करणाऱ्याचे अपघात होवून बरेच जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत पालकमंत्री व महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुडे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, उमरेड विधानसभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांना वेळोवेळी निवेदन दिले. परंतु गावकऱ्याच्या पदरी केवळ आश्वासन मिळाले.
मात्र आमदार संजय मेश्राम यांच्या माध्यमातून या रस्त्या करीता फक्त ८ लाखचा अपूरा निधी मिळालामुळे नागरीकात कमालीचा नाराजी व्यक्त होत आहे. या निधीत रस्त्याचे कोणतेही काम होणार नसून आम्हाला ५ किमी डांबरीकरण केलेला हा रस्ता २० ते २५ दिवसात तयार करून द्यावा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये चिखली, रोहणा या गावाचा बहिष्कार राहणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात येवून राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेशास बंदी राहणार असून याबाबतचे बॅनर लावणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भिवापूर वरून चिखली असा जि.प नागपूर अंतर्गत रस्ता साठगाव जि. चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा महत्वपुर्ण रस्ता आहे. हा रस्ता संपूर्ण खराब झाल्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणीला समोर जावे लागत आहे. यावेळी पत्रपरिषदेला सरपंच सौ. प्रणाली सतिश गारघाटे, उपसरपंच गणेश मनोहर फुलबांधे, श्रीमती कुसूम पुंड लीक डोये, सौ. वर्षा रामकृष्ण भिंगारे, सौ. आवडता अरुण माटे, शैलेश ईश्वर फुलझेले, सौ. रोषणी किशोर मालोदे, जयदेव नितीन फुलबांधे, रामकृष्ण भिंगांरे, उमेश धोटे




