कासा, दि.१५। रहे ान कु रशे ी डहाणू तालुक्यात मुंबई- अहमदाबाद मार्गावर काल पुन्हा भीषण अपघात झाला.ह्या अपघात तिघांचा मृत्यू झाला. मंगळवारी चारोटी जवळ असलेल्या एशियन पेट्रोल पंपाजवळ सकाळी ८.४० सुमारास कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला.हा अपघात इतका भीषण होता कि,अपघातातील मोटरसायकल वरील तिघांना कंटेनरने जवळजवळ ७० ङ्कूट ङ्करङ्कटत नेले यात तिघांचा मृत्यू झाला. स्पलेंडर मोटर सायकल एम.एच.४८.ऐ.जे.५६३५ व कंटेनर डि.डि.०१एच. ९१५८ ह्या दोन वाहनांचा अपघात झाला. कंटेनर गुजरात वरुन मुंबई कडे येताना एशियन पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल वळत असताना कंटेनरने जोरदार धडक देत ङ्करङ्कटत नेले. यात मोटरसायकल वरील काकडा रांधे(वय-४४)रा.सुञकार, स्वप्नील रांधे(वय-२४)रा.सुञकार व विष्णू कान्हात(वय-२८)सुञकार व विष्णू कान्हात(वय-२८)रा.खाचपाडा ह्या तिघांचा जागीच मृत्यू ओढवला आहे. ह्या अपघाताची माहिती मिळताच कासा पोलिस घटनास्थळी पोहचून मृत्यूंजय दूत स्टाङ्कच्या मदतीने मृतांना कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तर क्रेनच्या मदतीने कासा पोलिसांनी अपघातातील दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करुन दिली.