मुंबई दि. ९ प्रतिनिधी:राज्यभरात 29 महानगर पालिकांची निवडणूक होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंध नियमानुसार पुढील आठवड्यात बुधवार 14, गुरुवार 15 आणि शुक्रवार 16 तारखेला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू असलेल्या मनपा क्षेत्रांना हा ड्राय डे लागू असणार आहे. मात्र, तीन दिवसांच्या ड्राय डे मुळे तळीरामांची चांगलीच अडचण होणार आहे.




