मुंबई, दि.२४। प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईतील परळ येथे मध्य रेल्वेचं नवं टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईला चौथं मध्य रेल्वेचं टर्मिनस मिळणार आहे. सध्या परळमध्ये या जागेमध्ये रेल्वेचं मोठं वर्कशॉप आहे. आता येथील काही युनिट हे माटुंगा कारशेडमध्ये हलवण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरुन दररोज ८८ लांब पल्ल्याच्या गाड्या ये – जा करत असतात. त्यामुळे इथल्या यंत्रेणवर प्रचंड ताण येतो. तसेच दादर ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकादरम्यान काही तांत्रिक झाला तर त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होतो. अनेक रेल्वे यामुळे रद्द कराव्या लागतात. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी परळ येथे नवं टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.