कोळसा घोटाळ्यातील दोषींना ४ वर्षांची शिक्षा; १५ लाखांचा दंड

नवी दिल्ली, दि.२६। वृत्तसंस्था कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेप्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांचे सुपुत्र देवेंद्र दर्डा यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने कोळसा घोटाळ्याप्रकरणी कलम १२०बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने दोषींना १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणातीलच आणखी एक दोषी संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना ३ वर्षांच्या शिक्षेसह १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. जेएलडी यवतमाळ यांना १९९९ ते २००५ मध्ये जुने ब्लॉक देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *