मुंबई, दि.२६। प्रतिनिधी राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, अवर्षण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती घेऊन पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकऱ्यांना दिले. बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सैनिक, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, प्रधान सचिव असीम गुप्ता, आमदार संजय कुटे, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने तर दुसरीकडे काही जिल्ह्यामध्ये पावसाआभावी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. या सर्व पोर्शभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित यांनी पवार विविध जिल्ह्यातील पावसाची आणि पूरस्थिती जाणून घेतली.