पालघर, दि.२६। विशेष प्रतिनिधी मुंबई-बडोदा महामार्गासाठी झालेल्या भू-संपादनातून मिळालेल्या एक कोटी २ लाख रुपये गिराळे येथील शेतकरी प्रभाकर नारायण पाटील यांना मिळाले होते.मात्र वयोवृद्ध पित्याच्या अज्ञानाचा फायदा घेत खात्यातून सख्या मुलाने फसवणूक करून ती रक्कम परस्पर त्याच्या पतीच्या खात्यात वर्ग करून जन्मदात्या पित्याची घोर फसवणूक प्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात शेतकऱ्याच्या मुलावर ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या प्रकरणात महसूल विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आहे की काय? असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.पोलिस ठाणे सफाळेनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास तपास योग्य मार्गाने केल्याने हा फसवणुकीचा प्रकाराला वाचा फुटली आहे.रक्कम आल्याच्या चार दिवसातच ती रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सफाळे पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
सुरुवातीला मुलाने पैसे आहेत, आपला सातबारा घडला की पैसे देतो.अशी उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. या प्रकरणाच्या मुळाशी गेले असता, मुलाने त्याच्या बायकोच्या खात्यातून धनादेशदवारे एक कोटी दोन लाख रुपये पुन्हा प्रांत कार्यालयाच्या क्सिस बँकेच्या खात्यावर डिपॉझिट केल्याची बाब स्पष्ट झाली.या प्रकरणात गुंतागुंत वाढत असताना मुलाने आपल्या तक्रारदार पित्याला कोणालाही न कळविता गुपचूप विरार येथे हलविले होते.आणि केलेली पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्र वापरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी या प्रकरणाचे गांभीर्य पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर वयोवृद्ध प्रभाकर नारायण पाटील यांना पुन्हा सफाळे पोलिसांनी सुखरूप आणून त्यांच्या मुलीच्या स्वाधीन केले.त्या नंतर पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास करून त्या मुलावर गुन्हा दाखल करून फसवणुकीचा फिर्याद नोंदवून घेतली आहे. गुन्हा क्रमांक ६९/२०२३ ने भारतीय दंड संहिता ४२० प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे.या गुन्हाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.