8 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर, दि. 17- भारतीय संविधानाचे महत्व, नागरीकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्य तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त वसतिगृहे, निवासी शाळा व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांकरिता १५ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत ८ हजार ५०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतलेला आहे. या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या निबंध स्पर्धेकरिता एकुण पाच गट तयार करण्यात आलेले होते. जिल्हास्तरावर निबंधाची तपासणी करण्यात आली व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकावरील विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र व ३ हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांवर आलेल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधाची तपासणी करण्यात आली व त्यामधुन राज्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे निबंधाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच प्रथम कमांवरील विद्यार्थ्यास १५ हजार, द्वित्तीय कमांवरील विद्यार्थ्यास १० हजार व तृतीय कमांवरील विद्यार्थ्यास ५ हजार रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
असा आहे निकाल
शालेय स्तरावर प्रथम क्रमांक अकोला जिल्ह्यातील प्रणव गवई तर द्वितीय क्रमांक धुळे येथील प्रिया गांगुर्डे तर तृतीय क्रमांक हिंगोली येथील अक्षरा पुंडगे यांनी मिळविला आहे. उच्च माध्यमिक स्तरावर प्रथम क्रमांक चंद्रपूर जिल्ह्यातील रेश्मा घोडमारे तर द्वितीय क्रमांक गडचिरोली येथील समीक्षा जांभुळकर तर तृतीय क्रमांक कोल्हापूर येथील अमृता कांबळे यांनी प्राप्त केला आहे. महाविद्यालय स्तरावरील प्रथम क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाती शिंदे तर द्वितीय क्रमांक बीड येथील प्रतीक्षा सांगळे यांनी तर तृतीय क्रमांक लातूर येथील स्नेहा खरोसे यांनी प्राप्त केला आहे.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त अनुदानित वस्तीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्यातील दुर्गेश अतीश भदेवाड यांनी प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक संभाजीनगर येथील आदित्य आडे तर तृतीय क्रमांक यवतमाळ येथील अक्षरा कालिदास अरगुलवार यांनी प्राप्त केला आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या अधिनस्त दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक नाशिक जिल्ह्यातील भाग्यश्री किरण जाधव, द्वितीय क्रमांक नागपूर येथील राहुल प्रवीण झाडे तर तृतीय क्रमांक ठाणे येथील आकांक्षा त्रिपाठी यांनी प्राप्त केला आहे.




