नागपूर

‘संजय महाकाळकर काँग्रेसचे बिनविरोध गटनेते

नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाने गट नोंदणी केली असून चार वेळा नगरसेवक राहिलेले, अनुभवी नेतृत्व असलेले संजय महाकाळकर यांचे एकमताने गटनेते म्हणून निवड झाली आहे.

नागपूर महाविकास आघाडी’ या नावाने सर्वात प्रथम विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करून राजकीय आघाडी घेतली आहे. संजय महाकाळकर यांची गट नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. २०१७ मध्ये महाकाळकर यांना विरोधी पक्ष नेते केले होते. परंतु पक्षातील वादाचा फटका त्यांना बसला. पंधराच दिवसातच त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी २९ नगरसेवक असलेल्या काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले होते.

एका गटातून तानाजी वनवे यांनी विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला होता. त्यांनी सर्वप्रथम नोंदणी केल्याने संजय महाकाळकर यांच्या नियुक्तीनंतरही तानाजी वनवे यांना विरोधी पक्ष नेते घोषित करण्यात आले होते.

यावेळी काँग्रेसचे सर्व ३४ नगरसेवक उपस्थित होते. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव, कुणाल राऊत तसेच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सर्व ३४ नगरसेवकांनी चार वेळा नगरसेवक राहिलेले, अनुभवी नेतृत्व असलेले संजय मधुकर महाकाळकर यांची एकमताने ‘गटनेते’ म्हणून निवड केली. विशेष म्हणजे नगरसेवकांचा हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तात्काळ अधिकृतपणे मान्य केला.

या गटाचे नाव ‘नागपूर महाविकास आघाडी’ असे ठेवण्यात आले आहे. इतर धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांतील नगरसेवक काँग्रेससोबत येण्यास इच्छुक असल्याने, ही आघाडी आगामी काळात अधिक व्यापक व प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *