महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात

प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला की, संविधान निर्मात्याचे नाव गिरीश महाजन कसे विसरले. असा थेट सवाल केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजनांवर आक्षेप घेतला आणि त्या म्हणाल्या की मला निलंबित केले तरी चालेल, मी माती उचलण्याचेही काम करेल पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही.

यावेळी ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला की एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री जर प्रजासत्ताक दिनाला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला विसरत असेल तर स्वतःला पालकमंत्री म्हणून घेण्याची आणि मिनिस्ट्री मध्ये काम करण्याची त्यांची लायकी नाही. तुम्ही डॉक्टर आंबेडकर यांचे नाव न घेण्याची अक्षम्य चूक केली आहे.

ही चूक अनावधानाने, गिरीश महाजन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव माझ्या भाषणात अनावधानाने आले नाही. यामागे माझी कोणतीही अनैतिक भूमिका नव्हती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. आणि या झालेल्या चुकीबद्दल मी क्षमा मागतो.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *