पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नागपूर दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सोमवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १५ कस्तुरचंद पार्क येथें आयोजित करण्यात आला आहे रमहसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.त्यानंतर पोलीस दलाची मानवदना स्वीकारतील तसेच पथ संचलनाची पाहणी करतील.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ध्वजारोहणानंतर नागरिकांना संबोधित करणार आहेत. कवायती, पोलीस दलांचे पथसंचलनामध्ये विविध पथके सहभागी होत आहे. यामध्ये पोलीस दलांसह विद्यार्थी, विद्यार्थिनी ,पोलीस आदी असणार आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभास स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रसासकीय अधिकारी तसेच सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
सायंकाळी ५.३० वाजता आर. एस. ए. मुंडले हायस्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.





