तालुक्यातील दहेगाव येथील कार्यवाही.शाळेच्या परिसरात खेळत होते जुगार
मौदा प्रतिनिधी: सध्या मौदा तालुक्यात काही ठिकाणी चोरीच्या मार्गाने जुगार. अवैध दारू विक्री मोठ्या जोमात सुरू असून अनेकदा स्थानिक पोलिस धाडी मारण्याचे प्रयत्न करतात परंतु गावातीलच काही फंटर पोलिसांना माहिती देत आल्याने धाडी मारण्यासाठी पोलिसांना यश येत नाही, जे पोलिस सिंगम गिरी म्हणून काम करतात तेच अधिकारी धाडी टाकून त्यांनी रंगेहात पकडतात. असाच प्रकार तालुक्यातील दहेगाव येथील शाळेच्या परिसरात खेळत असलेल्या जुगारावर सिंगम गिरी करणाऱ्या पोलिसांनी धाड टाकून, ९ आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.
तालुक्यातील पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील नुकताच दिनांक ३०/१२/२०२५ रोजी मौदा पोलीसांना खबरीच्या माहिती वरून गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, दहेगाव येथे काही नागरिक हे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात खुलेआम जुगार खेळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सपडा रचत यात हे नागरिक पैशाची बाजी लाऊन ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही पोलिस जुगाराच्या सभोवताल झाल्याने त्यांनी कुणाचीही लक्ष न ठेवता लगेच ते त्या ठिकाणी धाड टाकून त्यांना रंगे हात पकडले, पोलिसांनी घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली,
यात घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) सुरेंन्द्र किष्णा आंबिलडुके, वय ३७ वर्ष, २) रामदास महादेव आंबिलडुके, वय ५८ वर्ष, ३) संजय संतोष सोमनाथे, वय ४२ वर्ष, ४) अनिल शिवदास आंबिलडुके, वय ४६ वर्ष, ५) हरिचंद्र दामाजी आंबिलडुके, वय ४५ वर्ष, ६) दिलीप रामराव आंबिलडुके, वय ३८ वर्ष, ७) जगदीश बालचंद हटवार, वय ४० वर्ष, सर्व रा. दहेगाव, ता. मौदा ८) कुंदन कंठिराम आंबिलडुके, वय ३० वर्ष, ९) सुजित टोलीराम निमजे, वय ३६ वर्ष, सर्व रा. धानला यांना जागीच पकडले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तास पत्ते व नगदी २९२०/- रूपये असा एकुण २९७०/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद ९ आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन मौदा येथे कलम १२ म जु का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत,




