देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रिंगणात असलेल्या 151 उमेदवारांपैकी भाजपचे 102 व शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार विजयी होत नागपूर महानगरपालिकेत भाजपा युतीने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप युतीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
15 तारखेला राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आणि त्याचा निकाल आज दहा वाजता पासून जाहीर झाला. लातूर चंद्रपूर आणि पालघर या तीन महानगरपालिका सोडून सर्वत्र भाजप आणि शिंदे सेना आघाडीवर आहे. नागपूर मध्ये रिंगणात असलेल्या 151 उमेदवारांपैकी भाजपाचे 102 उमेदवार, शिंदे शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 37, ठाकरे शिवसेना गट 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1, व इतर पक्षाचे आठ उमेदवार निवडून आलेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला आपले खाते उघडण्यात अपयश आलेले आहेत. काही भागांमध्ये काँग्रेसने भाजपाला काट्याची टक्कर दिली आहे. प्रभाग 21 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी आपले खाते उघडण्यात यश मिळविले आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून जेन झी उमेदवार दुर्गेश्वरी कोसेकर यांचा विजय झाला आहे. नागपूर मनपा मध्ये उबाठाचे एक खाते उघडले गेले आहे.




