दराोडेच्च्या तयाारीत असलेल्याा एकूूण १२आाराोपींच्च्या टोली गजाआड

पालघर, दि.१९। प्रतिनिधी पालघर शहरातील मोठ्या दरोड्याच्या तयारीत आलेल्या १२ चोरांच्या टोळीला गजाआड करण्यात पालघर पोलीस दलाला यश आले आहे. सोमवार दिनांक १७ जुलै रोजी रात्री गस्तीवर असताना पोलीस हवालदार रवींद्र गोरे पहाटे गस्तीवर असताना त्यांना ही टोळी दिसून आली होती. त्यांनी सतर्कता दाखवत वेळीच आपल्या वरिष्ठांची मदत घेत कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या बाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. या कारवाई मुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता तसेच गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे गस्त घालण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, प्रभारी अधिकारी यांनी पालघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रौगस्तीकरीता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नेमलेले होते.

दिनांक १७/०७/२०२३ रोजी २१.०० वा. ते दिनांक १८/०७/२०२३ रोजी ०५.०० वाजेपर्यंत पोउपनिरी संकेत पगडे यांना रात्रौगस्त अधिकारी म्हणून नेमलेले होते. तसेच पोहवा / रविंद्र गोरे, पोहवा / १८१६ आर. एम. पवार, पो.ना. / ७८४ लहांगे यांना पालघर शहर पेट्रोलींग व गुडमॉर्निंग स्कॉड कर्तव्याकरीता नेमण्यात आलेले होते. पालघर रेल्वे स्टेशन ते नवली फाटक परीसरात पेट्रोलींग करीत असतांना दिनांक १८/०७/२०२३ रोजी पहाटे ०३.१५ वाजताच्या सुमारास पालघर पूर्व येथील नवली फाटका जवळील एस. बी. आय. बँकेच्या ए. टी. एम. च्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत अंधाराच्या ठिकाणी काही इसम दोन मोटार टेम्पोसह संशयीतरीत्या काहीतरी हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोहवा / गोरे यांनी लागलीच रात्रौगस्त अधिकारी पोउपनिरी / पगडे यांना सदरची माहिती देऊन सदर ठिकाणी बोलावले असता ते लागलीच पालघर पोलीस ठाणेतील इतर पोलीस स्टाफ यांना सोबत घेवून सदर घटनास्थळी हजर झाले.

पोलीस स्टाप हे त्यांचेकडील बॅटरीच्या उजेडाच्या सहयाने लपुन बसलेल्या अनोळखी संशईत इसमाचा कसोसीने शोध घेत असतांना त्या दरम्यान सदर संशईत हे पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन व अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्याच्या तयारीत असतांना मोठ्या शिताफीने तसेच आजु बाजुस राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मदतीने संशईत एकूण १२ इसमांचा पाठलाग करून त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करुन अंगझडती घेतली असता त्यांचेकडे दोन चारचाकी मोटर टेम्पो, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नॉयलॉन दोर, लोखंडी कटावणी, दोन हॅन्डलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पुड असे साहीत्य आरोपी यांचेकडे मिळून आल्याने आरोपी यांचा दरोडा टाकण्याबाबत उद्देश स्पष्ट झाल्याने आरोपी विरुध्द पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर १७२ / २०२३ भा.द.वि.सं. कलम ३९९, ४०२, सह आर्म ॲक्ट क. ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोनि / दत्तात्रय किंद्रे, प्रभारी अधिकारी, पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, पोनि / दत्तात्रय किंद्रे, प्रभारी अधिकारी, पालघर पोलीस ठाणे, मसपोनि / मंजुषा शिरसाट, पोउपनि / बालाजी मुंढे, पोउपनि / संकेत पगडे, पोउपनि / दौलत आतकारी, सफौ / सुभाष खंडागळे, पोहवा / रविंद्र गोरे, पोहवा / पवार, पोहवा / आव्हाड, पोहवा / सुरूम, पोना / १०२३ मुसळे, पोना/ खराड, पोना/ लहांगे, पोना / डुबल, पोना / कांबळे सर्व नेमणूक पालघर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *