नागपूर

शिवरायांचा अवमान; कोरटकर विरोधातील तपासात दिरंगाई:इंद्रजित सावंत यांच्याकडून कायदेशीर नोटीस

नागपूर : अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लील, चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणारा कथीत पत्रकार प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल होऊन वर्ष होत आहे.
मात्र पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोरटकर विरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या संथ तपासावर नाराजी व्यक्त करत इंद्रजित सावंत यांनी पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. कोरटकर सध्या आहे कुठे, त्याने किती वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावली, पोलिसांच्या तपासाची सध्यस्थिती काय याची उत्तरे सावंत यांनी पोलिसांकडे मागितली आहेत.
प्रशांत कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी भ्रमणदूरध्वनीवरून संभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले. शिवराळ भाषेतील त्याच्या आवाजाचे नमुने सावंत यांनी पोलिसांना सादर केले आहेत.
कोरटकरच्या आवाजाचे हे नमुने पोलिसांनी न्याय वैद्यक प्रयोगशाळेला पाठवले. त्याच्या निष्कषार्चा तपशीलही अद्याप सावंत यांना मिळालेला नाही. त्यामुळे सावंत यांच्यावतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. आसिम सरोदे ?ड श्रीया आवळे, ?ड. योगेश सावंत, ?ड. हेमा काटकर आणि ?ड. सकलेन मुजावर यांच्यामार्फत पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
कोरटकर नेमका आहे कुठे
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी १ मार्च २०२५ ला प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान कोरटकरला जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी व शर्थी घातल्या होत्या. त्याला नियमीत पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्थींचे पालन होत आहे का?, प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे कि दुबईत पळाला, असे प्रश्न सावंत यांनी पोलिसांना बजावलेल्या नोटीसीतून उपस्थित केले आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *