टॉप स्टोरी नागपूर

प्रचाराची रणधुमाळी थांबली

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी 5.30 वाजता थांबली. पक्षाच्या प्रचारासाठी प्रचारसभा, मुलाखती, रॅली, तसेच ध्वनिक्षेपकावरील भाषणे, गल्लीबोळ्यात ऐकू येणारे प्रचारगीत आता थांबलेले आहे. प्रचार साहित्य हे काढून घेण्यात येत असून आता निकालाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे.

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे हाय होल्टेज ड्रामा नागपुरात बघायला मिळाला. या उमेदवारांनी बंडखोरी मागे घ्यावी म्हणून भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी सुद्धा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येथे प्रचार सभा आणि त्यांनी तर्री पोह्याचा कार्यक्रम सुद्धा मुलाखती द्वारे आयोजित केला. आणि या माध्यमातून नागपूर येथील जनतेशी त्यांनी खुला संवाद साधला आणि विकासाचे विजन मांडले.

चना पोहा विथ नितीन गडकरी या कार्यक्रमातून नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रचार केला. वीस वर्षांपूर्वी ज्या नागपूरवर काँग्रेसचा ताबा होता त्यांनी सत्ताधाऱ्यांनी नागपूरला लुटले असा प्रचार करीत स्वतःच्या विजयाचे मार्ग खुले केले. आमदार विकास ठाकरे, नाना पटोले, यांच्या प्रचार सभा झाल्या. या सर्व प्रचार मोहिमा आता थांबल्या आहेत. नागपूरचा महापौर कोण होणार याकडे जनतेने लक्ष वेधले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *