नागपूर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भव्य बाईक रॅली काढली. ठिकठिकाणी फुगे, भाजपचे झेंडे, भगव्या पताका, तोरण, स्वागतद्वार उभारत मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करीत स्थानिक नागपूरकरांनी व विविध संघटनांनी या रोड शोचे भव्य स्वागत केले. यामुळे भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि समर्थकांमध्ये चैतन्य संचारले होते.
मध्य नागपुरातील भारत माता चौक येथून सुरुवात झाली. तीन नळ चौक, शहीद चौक, इतवारी चितार रोळी, गांधी पुतळा, बडकस चौक व महाल मार्गे जात गांधी गेट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रोड शोचा समारोप झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले की उमेदवार बघण्यापेक्षा कमळचे बटन दाबावे. नागपूर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




