टॉप स्टोरी देश

चिनी सैन्याचा भारतीय हद्दीत प्रवेश :राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ

संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बोलताना राहुल गांधी यांनी कारवा पत्रिकेमध्ये प्रकाशित माजी लष्कर प्रमुख एम. एम.नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचे काही अंश वाचण्यास सुरुवात केली आणि वक्तव्य केले की चिनी सैनिक भारतीय हद्दीमध्ये शिरलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतल्याने संसदेत मोठा गदारोळ निर्माण झाला.
माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा हवाला देत संसदेमध्ये चीन आणि डोकलाम संदर्भातील विधानांचा उल्लेख करू इच्छित होते. मात्र राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला की राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये याचा उल्लेखच नव्हता. आणि राहुल गांधी ज्या पुस्तकाचा हवाला देत आहे ते कधीच प्रकाशित झाले नाही. राहुल गांधी यांचा संदर्भ चुकीचा आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखले आणि जे पुस्तक प्रकाशित झाले नाही त्यावर संसदेत चर्चा केली जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले.
गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींवर आक्षेप घेतला की, राहुल गांधी यांनी हे पुस्तक प्रकाशित झाले की नाही हे सांगावे. यावर सभागृहाची दिशाभूल करू नका आणि अनावश्यक भाष्यही करू नका असे राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की एम. एम. नरवणे यांच्या रिपोर्टच्या अहवालानुसार भारतीय सेनेजवळ आले. चिनी सैन्याचे टॅंक भारतीय सिमेजवळ आलेत. चार चिनी टॅंक भारतीय सिमेत प्रवेश करत होते. चिनी सैन्याचे टॅंक कैलाश पर्वतावर चढत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले हे लोक पुस्तकाला घाबरत आहे. जर ते घाबरत नसतील तर त्यांनी पुस्तक वाचू द्यावे. यावर संसदीय कामकाज मंत्री किरन रिजिजू म्हणाले की सभागृह नियमानुसार चालते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *