हजारो विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नातील मार्गदर्शक दुवा – डॉ. अवधूत निरगुडे
‘डॉक्टर’ या नावाभोवतीचं प्रतिष्ठेचं वलय काही वर्षांपूर्वी जितकं प्रभावी होतं, तितकंच ते आजही कायम आहे. पालकांना आपल्या पाल्याने डॉक्टर व्हावं असं वाटतं आणि विद्यार्थ्यांनाही “डॉक्टर” हे बिरूद भूषवण्याचं आकर्षण अजूनही तितकंच तीव्र आहे. मात्र भारतातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचं वास्तव पाहिलं, तर शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा आणि पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत आहे. याच तफावतीमुळे एमबीबीएस प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा निर्माण होते आणि अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची डॉक्टर होण्याची स्वप्नं अपूर्ण राहतात.
याच वास्तवाला पर्याय देत, भारतात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्याचा मार्ग दाखवणारे नांदेडचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. अवधूत निरगुडे आज हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक दुवा ठरत आहेत.
डॉ. अवधूत निरगुडे सांगतात की, स्वतःच्या मुलाच्या तसेच मित्र-नातेवाईकांच्या मुलांच्या एमबीबीएस प्रवेशाच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. या प्रक्रियेतूनच परदेशी वैद्यकीय शिक्षणाबाबत सखोल माहिती मिळाली. भारतातील मर्यादित जागांच्या तुलनेत परदेशात उपलब्ध असलेल्या संधी अधिक व्यवहार्य, परवडणाऱ्या आणि दर्जेदार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे सव्वा लाखाच्या आसपास वैद्यकीय शिक्षणाच्या जागा उपलब्ध असतात. यापैकी साठ ते सत्तर हजार जागा शासकीय असून उर्वरित खाजगी व निमशासकीय आहेत. मात्र दरवर्षी नीट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाखांहून अधिक असते. खाजगी महाविद्यालयांची फी सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारी नसल्याने अनेक विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचं स्वप्न दुरावते.
डॉ. निरगुडे स्पष्टपणे सांगतात की, ज्या विद्यार्थ्यांना भारतात एमबीबीएससाठी प्रवेश मिळत नाही, ते विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. रशिया, उझबेकिस्तान, आर्मेनिया यांसारख्या देशांमधील शासकीय वैद्यकीय विद्यापीठांमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. मात्र परदेशी शिक्षण घेताना तेथील शिक्षण इंग्रजी माध्यमात आहे का, हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे, कारण काही देशांमध्ये मातृभाषेत शिक्षण दिलं जातं.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र जागा राखीव असतात आणि इंग्रजीत अध्यापन करणारे प्राध्यापक असणं ही महत्त्वाची अट असते. सध्याच्या परिस्थितीत उझबेकिस्तान आणि रशिया हे देश वैद्यकीय शिक्षणासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचं ते नमूद करतात.
ही माहिती पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, योग्य मार्गदर्शन मिळावं आणि कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी डॉ. अवधूत निरगुडे एमडी हाऊस (चंदीगड) या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवण्याचं कार्य करीत आहेत. 2017-18 पासून सुरू असलेल्या या कार्यात आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वीपणे परदेशात शिक्षण घेत आहेत आणि विशेष म्हणजे आजपर्यंत एकही तक्रार आलेली नाही, हे ते अभिमानाने सांगतात.
विद्यार्थ्यांना 14–15 जणांच्या छोट्या बॅचेसमध्ये शिक्षण दिलं जातं. स्वयंअध्ययनावर भर, वैयक्तिक लक्ष, उत्तम होस्टेल्स, राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या सुविधा, शिस्तबद्ध वातावरण यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही समाधानी आहेत.
2018 नंतर परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा पात्र असणं बंधनकारक आहे. नीट पात्र न होता परदेशात शिक्षण घेतल्यास भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी एफएमजीई (Foreign Medical Graduate Examination) उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तसेच कोणत्याही देशात वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या त्या देशाच्या मेडिकल कौन्सिलच्या परीक्षा पास कराव्या लागतात, याबाबत ते स्पष्ट आणि प्रामाणिक मार्गदर्शन करतात.
कोविड काळात तसेच युक्रेन–रशिया युद्धाच्या वेळी एमडी हाऊसच्या माध्यमातून पाठवलेले सर्व विद्यार्थी सुखरूप होते. युद्धकाळात विद्यार्थी पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचेपर्यंत डॉ. निरगुडे, त्यांची टीम आणि प्रतिनिधी सतत संपर्कात होते. सर्वोच्च न्यायालय, एमसीआयच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना उझबेकिस्तान, रशिया व इतर देशांमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली.
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील सांडस गावचे रहिवासी असलेले डॉ. अवधूत निरगुडे आजही आपल्या गावाशी आणि शेतीशी घट्ट जोडलेले आहेत. हजारो रुग्णांवर उपचार करत असताना सामाजिक संवेदनशीलता त्यांनी कधीही सोडलेली नाही.
त्यांचे वडील कै. प्रा. डॉ. राघोजी निरगुडे — मराठवाड्यातील पहिले अर्थशास्त्रातील पीएचडी — आणि आई गंगाबाई निरगुडे यांच्या संस्कारांतूनच त्यांची जडणघडण झाली. अडल्या-नडलेल्या लोकांना मदत करणे, गावातून उपचारासाठी आलेल्यांची राहण्याची व जेवणाची सोय करणे, ही माणुसकीची शिकवण त्यांनी लहानपणापासून अनुभवली.
जलसंधारण, पाणी अडवा–पाणी जिरवा, नैसर्गिक शेती यांमुळे प्रेरित होऊन त्यांनी आपल्या गावात मोठं काम उभं केलं. पोलीस विभाग, प्रशासन, शास्त्रज्ञ, सामाजिक संस्था, डॉक्टर, पत्रकार, शेतकरी आणि गावकऱ्यांच्या सहभागातून 23 किलोमीटर ओढा खोलीकरण व सरळीकरणाचं काम पूर्ण झालं. ही योजना मधे बंद पडली असली, तरी पुन्हा सुरू करण्याचा निर्धार ते व्यक्त करतात.
तीस वर्षांच्या अनुभवातून, पत्नी डॉ. उर्मिला निरगुडे यांच्या सहकार्याने लाखो रुग्णांवर उपचार करताना आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवनशैली आहे, हा विचार त्यांनी समाजात रुजवला. वंधत्व, वात, मणक्यांचे, पोटाचे आजार आयुर्वेद आणि पंचकर्म उपचाराने बरे होऊ शकतात, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
मुलगी डॉ. अक्षता आणि मुलगा डॉ. ओमकार यांच्यासह संपूर्ण निरगुडे कुटुंब आयुर्वेद, शिक्षण आणि सामाजिक सेवांचा वारसा पुढे नेत आहे. वडिलांच्या विचारांच्या आणि आईच्या मायेच्या पायावर पाय ठेवून घडलेली ही डॉक्टरांची निर्मिती आज साता समुद्रापार पोहोचलेली आहे.
विद्यार्थ्यांना दिशा, रुग्णांना आरोग्य आणि समाजाला संवेदनशीलता देणारे डॉ. अवधूत निरगुडे आज हजारो विद्यार्थ्यांच्या डॉक्टर जेहोण्याच्या स्वप्नातील खरे मार्गदर्शक दुवा ठरले आहेत. त्यांच्या या बहुआयामी, सेवाभावी आणि प्रेरणादायी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
–डॉ.अवधूत निरगुडे संपर्क क्रमांक
8421503445




